डॉन बॉस्को परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांकडून दहशत, छेडछाड करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची पोलीस निरीक्षकांकडे महिलांची मागणी
अहिल्यानगर : डॉन बॉस्को परिसरामध्ये अल्पवयीन मुले व त्यांचे मुख्य सूत्रधार यांच्याकडून नागरिकांना त्रास होत असून दहशत निर्माण करून महिलांची व मुलींची छेडछाड करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, या ठिकाणी महापालिकेकडून ख्रिस्ती बांधवांसाठी भव्य असे समाज मंदिर बांधून दिले असून या ठिकाणी डॉन बॉस्को व नागापूर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुले एकत्रित येऊन दारू, गांजाचे व्यसन करत असतात तसेच त्यांच्याजवळ हत्यारे असतात रात्री अपरात्री या ठिकाणी मोठमोठ्याने गोंधळ घालत असतात त्यामुळे आमच्या मुला-मुलींना घरामध्ये बंद करून ठेवावे लागते तसेच या ठिकाणी शाळा क्लास असून मुलांना सोडवण्यासाठी जात असताना ही टूकार मुले छेडछाड करत असतात तरी या मुलांचा पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी डॉन बॉस्को परिसरातील महिला नागरिक यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपत बारस्कर म्हणाले की, डॉन बॉस्को परिसरातील नागरिक गुंडगिरी करणाऱ्या मुलांकडून त्रस्त झाले आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कायद्याचा धाक उरला नाही, ते अल्पवयीन असल्याचा फायदा घेत दहशत निर्माण करत आहे अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांनी देखील आपल्या मुलांना शिस्त लावावी, जेणेकरून आपला मुलगा गुन्हेगार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे तरी पोलीस प्रशासनाने तातडीने उपयोजना करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कारवाई करावी याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून डॉन बॉस्को परिसरामध्ये सांस्कृतिक भवन उभे राहिले असून या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून अंगरक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे बसून देण्याची मागणी आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे ते म्हणाले
सागर बोरुडे म्हणाले की डॉन बॉस्को परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या टुकार गँगचा बंदोबस्त तातडीने होणे गरजेचे आहे पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केले आहे याचबरोबर महापालिकेने देखील या परिसरामध्ये लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे ते म्हणाले
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना कायद्याच्या जोरावर आपण नीट करू, महिलांनी घाबरायचे कारण नाही, पोलीस तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही फक्त तक्रार द्या, या भागामध्ये सातत्याने पोलीस गस्त घालत आहे, अल्पवयीन मुले असल्यामुळे कायद्याचे काही बंधन येत असतात त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करता येत नाही, तरी आपल्या आई-वडिलांनी मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांबरोबर राहून देऊ नका, गुन्हेगारांना सरळ करण्याचे काम पोलीस प्रशासन करेल नागरिकांनी देखील पोलिसांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटना सांगितल्या पाहिजे व त्याची तक्रार देखील दिली पाहिजे असे ते म्हणाले


