अहिल्यानगर-मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव करून, शहरातील एका ५१ वर्षीय सिव्हील इंजिनीअरला ९ लाखाला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सावेडी परिसरात राहणाऱ्या इंजिनीअरला ‘राज आनंद’ या नावाने ब्लू डार्ट सर्व्हिसकडून व्हॉट्सअॅपवर कॉल आला. ‘तुमच्या नावाने अवैध पार्सल पाठवले जात आहे’, ‘तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे’, असे भितीदायक संदेश पाठवून घाबरवण्यात आले. भामट्यांनी इंजिनीअरला ‘विजय पाल’ नावाच्या दुसऱ्या नंबरवर व्हीडीओ कॉल करून, ‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात’ असे सांगितले. ‘तुमचे बँक खाते चौकशीसाठी तपासावे लागेल’ अशी खोटी माहिती देऊन, इंजिनीअरच्या खात्यातील ९ लाख रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित करायला भाग पाडले. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. पैसे परत न मिळाल्याने ३१ ऑक्टोबर रोजी इंजिनीअरने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्यात राज आनंद आणि विजय पाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पैदाम करत आहेत.
सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल ! नगर शहरातील सिव्हील इंजिनीअरला ९ लाखाला गंडवले
0
7
Related Articles
- Advertisement -


