Thursday, October 30, 2025

आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला ! नगर जिल्ह्यातील घटना

पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी दुपारी आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन सहकार्‍यांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वेदांत दत्तात्रय कुलट (वय 14, रा. आष्टावाडा, पाथर्डी) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याला पाठीवर धारदार चाकूने गंभीर इजा झाली आहे. प्राथमिक उपचार पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेदांत हा शहरातील एका विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी परीक्षा असल्याने तो दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आला होता. त्यानंतर खाजगी कामानिमित्त तो दुचाकीवरून शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गेला. याच दरम्यान त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले.

किरकोळ वादातून एका मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.हल्ला झाल्यानंतर परिसरात काही काळ अफरातफरीचे वातावरण होते. स्थानिकांनी वेदांतला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही संशयित विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पोलीस ठिकाणी गेले आहेत. शालेय वयातील मुलांच्या हातात चाकू कसा पोहोचतो, याबाबत समाजातही चिंतेची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles