भारताने बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यानंतर काल रात्री पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर भारताने आज पाकिस्तानच्या १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले केले. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय लष्करानं आता स्पष्ट केलं आहे. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. गेल्या ६५ वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणं ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचं पाणी वापरणार, असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं आहे.पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळवून लावला आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केलं असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नव्हता. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार. त्यानंतर अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह भारताच्या १५ शहरांवर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केली. त्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि तोफांचा हल्ला केला. त्यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला. तीन महिलांचा त्यामध्ये समावेश आहे. एकंदरीत भारताने पाकड्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय.
पाकिस्तानी मंत्र्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा
ऑपरेशन सिंदूरबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, “पाकिस्तान जगभरात दहशतवादाचा चेहरा बनला आहे. तुम्हाला ओसामा बिन लादेन कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटले, हे आठवण करून देण्याची गरज नाही. पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेले आणि अनेक देशांनी प्रतिबंधित केलेले दहशतवादी आहेत. गेल्या काही दिवसांत, त्यांचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री यांनी अशा दहशतवादी गटांशी त्यांचा देशाचा संबंध असल्याचे मान्य केले आहे”, असे त्यांनी म्हटले.


