केंद्रीय निवडणूक आयोगाचा ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल,…असे आहेत बदल…

EVM बॅलेटवर आता उमेदवारांचे रंगीत फोटो, निवडणूक आयोगाने केली सुधारणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने EVM बॅलेट पेपर म्हणजे यंत्रावर लावण्यात येणाऱ्या मतपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल केले आहेत. बिहारमधील विधानसभा निवडणुकीपासून हे बदल लागू होणार आहेत. मतदारांना अधिक सोयीचे जावे, या दृष्टीने हे बदल केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

असे आहेत बदल…

ईव्हीएम बॅलेट पेपरवर आता उमेदवारांचे रंगीत फोटो असतील. याआधी उमेदवारांचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट असायचे.
उमेदवाराचा फोटोतील चेहरा बॅलेट पेपरचा तीन-चतुर्थांश भाग व्यापेल एवढा असणार आहे. त्यामुळे उमेदवाराला ओळखणे मतदारांसाठी सोपे जावे, असा उद्देश आहे.

उमेदवाराचे नाव आणि त्याचे चिन्ह यांच्या मध्ये त्याचे छायाचित्र असणार आहे.

बँलेटवरील उमेदवारांची नावे ठळक अक्षरात आणि ३० आकाराच्या फ़ॉण्टमध्ये छापायची आहेत. नोटा पर्यायही त्याच आकारात आणि भाषेत छापलेला असेल.

बॅलेट पेपरचा कागद लोकसभेसाठी पांढऱ्या तर विधानसभेसाठी गुलाबी रंगाचा आणि ७० जीएसएम पेपर प्रकारातील असेल.
बिहार विधानसभा निवडणुकीपासून हा बदल लागू होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles