Saturday, February 21, 2026

मनपा आयुक्त म्हणतात…..नगर शहरातील ओढे नाल्यांची १०० टक्के साफसफाई पूर्ण

अहिल्यानगर शहरातील ओढे नाल्यांची १०० टक्के साफसफाई पूर्ण

वेळेत साफसफाई झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत

सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना सुरू : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील विविध ओढे नाल्यांच्या साफसफाईचे काम महानगरपालिकेकडून १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. ओढे व नाल्यातून पाण्याचा प्रवाह अडणार नाही, या दृष्टीने आवश्यकतेनुसार पात्राची सफाई करून गाळ व इतर कचरा काढण्यात आला आहे. त्यामुळे शहरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत झाली आहे. तसेच, सीना नदी पात्रात आवश्यक ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. नदीच्या काही भागात सफाईचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेने एप्रिल महिन्यापासून नालेसफाईचे काम हाती घेतले होते. प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई ९ जून पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. यात सनी पॅलेस मागील बाजू – सुर्यानगर (पुल) – तवलेनगर मागील बाजु ते निर्मलनगर ते भगवान बाबा चौक पर्यंत, भगवान बाबा मंदिर – शिरसाठ मळा शेती मधुन – बालाजी कॉलनी पर्यंत, साई इंग्लीश स्कुल शेजारील शिव चिदंबर मंदिर पासुन गावडेमळा पुल ते ध्यान मंदिर ते कादंबरी नगरी पुल, किसनगीरी नगर ते पिचींग नालापर्यंत – नाल्यापासुन पुढे गजराज फॅक्टरी जवळील पुल – रस्ता ओलांडून गजराज फॅक्टरी ते जाधवमळा, पाईपलाईन रोड डी मार्ट समोरील पुल ते मनमाड रोड ते अर्जुन वॉशिंग ते फुलारी यांच्या शेतापर्यंत, मंगल हौसिंग सोसायटी ते बारा ईमाम ट्रस्ट जागा ते कृष्ठधाम रोड पर्यंत, अमोल विहार जवळील नाला + रासनेनगर पुल – कैलास हौसिंग सोसायटी – मनमाडरोड (पंचशील हॉटेल जवळील पुल), डीझायनर सोसायटी – प्रभाग बेकरी मागून एलटी गेस्ट हाऊस ते कैलास हौसिंग सोसायटी, बालिकाश्रमरोड – न्युक्लिअस हॉस्पीटल समोर – वाकळेमळा ते नामदेव मंदिरमागे – ताठेनगर, जिल्हाधिकारी कार्यालयामागे मार्कडेय सोसायटी – हनुमान मंदिर शेजारी – अष्टविनायक अपार्टमेंटसमोर सीक्युआयव्ही भिंतीलगतचा नाला – मिस्कीनमळा ते तारकपुर रोड पुल ते सिव्हील हडको नाला – गणेशचौक ते महावीर जैन स्थानक, मनमाडरोड हॉटेल ओबेरॉय शेजारुन ते महावीरनगर ते चिंतामणी हॉस्पीटल, तारकपुर ते सिव्हील कॉटर्स मागील बाजु ते पत्रकार वसाहत कोपरा, मनमाड रोड पत्रकार चौक सारडा कॉलेज शेजारुन ते महावीरनगर, आंबेडकर कमान (बालिकाश्रमरोड) पुल ओलांडून पुढे सुडकेमळा ते गंधेमळा कोपरा, देशमुख वाडी सर्जेपुरा – झेडपी वसाहत दक्षिण बाजुने पोलीस वसाहत ते पोलीस ग्राऊंड, सारसनगर – बागवान कब्रस्थान – करपे विटभट्टी – सारसनगर पुल – सागर व्हीडीओकॉन कंपनीपुल – भोसले लॉनपर्यंत, गायके मळा ते नविन रेल्वे पुल ते आगरकरमळा ते काटवन खंडोबा नविन पुल, केडगांव – जुनी स्वास्तिक कंपनी मागील येवलेमळा ते नगर-पुणे रोड, केडगांव – हॉटेल संदिप मागील ओढा, सोनेवाडी रोड ते अमरधाम पुल ते हरिजन वस्ती मागील भाग ते जुना बंधारा (कोतकरमळा) ते देवीरोड पुल ते चिपाडे मळा ते रेल्वे लाईन, मल्हार लॉन ते हजारे घर (केडगांव), बोल्हेगांव – आंबेडकर चौक ते गणेश चौक, नागापुर पुलाखालुन – अमित मोटर्स ते सिनानदी जुना पुल, कलानगर ते बारा ईमाम ट्रस्ट जागा, गाडगीळ पटांगण समोरील वैरागी सप्लायर्स ते हॉटेल शेडपर्यंत, कायनेटीक चौक ते यश ग्रॅण्ड ते मल्हारचौक – चारी/गटार, आव्हाड वीट भट्टी ते सिनानदी, सीना नदी पात्रातील काटवन खंडोबा पुल ते वाबावाडी समोर – कल्याणरोड नविन पुल ते अमरधाम पर्यंत, लोखंडी पुलाखालील भाग (अमरधाम) या ठिकाणी नालेसफाई पूर्ण करण्यात आली आहे.

शहरातील काही भागात पावसाचे पाणी सखल भागात साचत आहे. या भागात पाहणी करून तेथील बंदिस्त झालेल्या पावसाळी गटारीच्या माध्यमातून या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. बांधकाम विभाग व इतर विभागांना याबाबत पाहणी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ नियोजन करून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles