Friday, February 20, 2026

Video: लग्नाच्या विधीवेळी विचित्र घडलं, नवरीच्या त्या कृत्याने वऱ्हाडींना बसला शॉक

लग्न समारंभात अनेकदा गमतीदार किंवा आश्चर्यकारक घटना घडताना पाहायला मिळतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या विधी आधी नव्या नवरीने असे काही केलं ते पाहून उपस्थित पाहुणेही थक्क झाले.
नवरीच्या कृतीने सर्वांच हैराण

व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला लग्न समारंभ सुरु असलेला दिसत आहे. दरम्यान लग्नातील पुढील विधीसाठी सुरुवातीस नवरदेव स्टेजवर येतो त्यानंतर नवरही स्टेजवर येत असते. मात्र, नवरीला व्यवस्थितरित्या स्टेजवर येता यावे म्हणून नवरदेव नवरीला पकडण्यासाठी हात पुढे करतो. पण, नवरी चक्क नवरदेवाच्या हातावर थुंकते. सर्व प्रकार कॅमेऱ्यामन शुट करत असलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

नवरीच्या अशा कृतीने लग्न मंडपात जमलेले पाहुणे हैराण होतात. काहीजण नवरीच्या अशा वागण्याची चर्चा करण्यास सुरुवात करतात. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने देशभर व्हायरल झालेला आहे. त्यात तो इन्स्टाग्राम, फेसबूक आणि एक्स(ट्वीटर) या माध्यमांवर पाहता येत आहे. सध्या तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील statemirrornews या अकाउंटवर १५ तासांपूर्वी अपलोड केला आहे.

टीप: हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles