क्रिकेट प्रेमी जोडपं! बारशाला मुलाचं नाव सांगण्यासाठी दाखवली IPL ची जर्सी; व्हिडीओ …..

आयपीएल २०२६ चा मोसम सुरू झाला असून प्रत्येक जण स्वतःच्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. फक्त सोशल मीडियावरच नाही ज्या दिवशी आवडत्या टीमचा सामना असतो त्यादिवशी कामावरून लवकर येऊन, जर्सी घालून, टीव्हीसमोर बसून मॅच जिंकण्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये लेकराच्या बारशासाठी सुद्धा चक्क आयपीएलच्या प्रसिद्ध टीमच्या जर्सीचा वापर करण्यात आला आहे.

अनेकदा बारशाला बदाम, पाने, फुले किंवा कार्टूनच्या आकारात लहान मुलांनी नावे लिहिली जातात. मग त्यावर लावलेला कागद काढून नाव सगळ्यांना सांगितले जाते. पण, महाराष्ट्रातील एका जोडप्याने मुलाच्या नामकरण सोहळ्याला आयपीएलमधील टीमच्या जर्सीचा अनोखा वापर केला. ‘रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) टीमच्या जर्सीचा वापर करून आपल्या बाळाचं नाव विराट असे सांगितले आहे. क्रिकेटवरील निस्सीम प्रेम आणि कौटुंबिक परंपरा यांचा अत्यंत हृदयस्पर्शी संगम पाहायला मिळाला.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gaurimahadik1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles