अक्षय तृतीयेनिमित्त इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहन खरेदीसाठी गर्दी
75 ह्युंदाई कार्सचे वितरण; विविध सुविधा व उत्कृष्ट सेवेमुळे ग्राहक संतुष्ट
नगर (प्रतिनिधी)- अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. ग्राहकांनी आपल्या परिवारासह वाहन खरेदीसाठी हजर होते. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांनी विनम्र आणि तत्पर सेवा देवून ग्राहकांचे स्वागत केले. सुमधूर संगीताचा आवाज आणि शोरुमचा गजबजलेल्या प्रसन्न वातावरणात ह्युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे 75 कार्सचे वितरण करण्यात आले. ग्राहकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे संचालक विजयकुमार गडाख यांनी सर्व ग्राहकांचे आभार मानले आणि त्यांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.
ग्राहकांच्या समाधानासाठी इलाक्षी ह्युंदाई शोरुमतर्फे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये घरपोच डिलिव्हरी सेवा, अतिरिक्त वॉरंटी, ह्युंदाई मोबाईल ॲपमधून सुविधा यांचा समावेश होता. या बाबत जनरल मॅनेजर राजू बेजगमवर यांनी इलाक्षी ह्युंदाई ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यास नेहमीच बांधील असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी वाहन खरेदीनंतरच्या सेवेसाठीही इलाक्षी ह्युंदाई नेहमी तत्पर राहणार असल्याचे सांगितले. शोरुममध्ये आलेल्या ग्राहकांनी दिलेल्या सेवा, स्वागत व संपूर्ण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी ग्राहक, शोरूमचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहन खरेदीसाठी गर्दी 75 ह्युंदाई कार्सचे वितरण
- Advertisement -


