गौतमी पाटील ही मराठी मनोरंजन विश्वातील एक खूप लोकप्रिय नाव आहे. तिचे डान्स व्हिडिओ हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ऐवढेच नाही तर सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा असा फॅन बेस आहे. विशेषत तरुण वर्गामध्ये तिची प्रचंड क्रेझ आहे. तिने अनेक कार्यक्रमांमध्ये आणि लावणी परफॉर्मन्सद्वारे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि सुप्रसिद्ध कलाकार आण्णा नाईक यांनी एकत्र डान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘बाई वाड्यावर’ या लावणी गाण्यावर या दोघांनी केलेल्या जोरदार परफॉर्मन्स दिला आहे.
या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील पारंपरिक लावणीच्या पोशाखात दिसते आहे शिवाय तिच्या चेहऱ्यावरील भाव, आणि नृत्याची लयबद्धता हे सर्व पाहून प्रेक्षक भारावून जात आहेत शिवाय दुसरीकडे आण्णा नाईक यांचाही उत्साही सहभाग आणि डान्स अतिशय भारी आहे. या दोघांची जोडी प्रथमच एका मंचावर आली असून, ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.
या दोघांनी मिळून केलेला हा परफॉर्मन्स इतका जबरदस्त आहे की, हा डान्स व्हिडिओ अपलोड होताच काही तासांतच हजारो लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.शिवाय नेटकरी वर्गातून या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया देखील मिळालेल्या आहेत.”अण्णा नाईक जय जोमात दिसत आहेत” असे एका यूजरने म्हटले आहे, तर दुसऱ्या यूजरने म्हटले की,”फारचं भारी राव” असा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या दिसून येत आहेत.


