Saturday, February 21, 2026

नगरमध्ये वीज वाहक तारांचा धोका; माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले…..

अहिल्यानगरमध्ये वीज वाहक तारांचा धोका;
घराजवळून गेलेली वीज वाहक तार तुटून गाईच्या अंगावर कोसळली; गाईचा मृत्यू

गाई मालकास भरपाई द्यावी; वीज वाहक तारा लवकरात लवकर दुरुस्ती करावी – माजी नगरसेवक निखिल वारे

नगर – अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील वसाहतीत वीज वाहक तारा अत्यंत घराजवळून गेल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन विजेचा धक्का लागण्याची शक्यता लक्षात घेता, यासंदर्भात नगरसेवक निखिल वारे यांनी विद्युत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर डोके नगर भागात एक वीज वाहक तार तुटून जमिनीवर कोसळली आणि त्याचा संपर्क आल्यामुळे एका गायीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी गाईच्या मालकाला भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, “मी सातत्याने विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. अनेक वेळा निवेदनं दिली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, पण दुर्लक्षच झालं. ही दुर्घटना केवळ गायीपुरती मर्यादित राहिली, ही दुर्दैवाची बाब असली तरी उद्या एखाद्या माणसाच्या जीवाला धोका झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”

ते पुढे म्हणाले, “वीज तारा झाडांमध्ये अडकलेल्या, घराजवळून गेलेल्या अनेक ठिकाणी धोका कायम आहे. दोन दिवसांपूर्वी मी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन दिलं आहे. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या तारा तातडीने दुरुस्त केल्या नाहीत, तर आंदोलनाचा इशाराही आम्ही देऊ.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles