Friday, February 20, 2026

अजितदादांचा विमान अपघातात मृत्यु.. 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार सभांचे आयोजन करण्यात आले होते, याच सभांना पोहोचण्यासाठी अजित पवार 8.10 ला मुंबईहून निघाले आणि बारामती विमानतळाच्या अगदी जवळ भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओही पुढे आली. काही सेकंदात विमान जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला.

सध्या या विमान अपघाताची सीआयडीकडून चाैकशी केली जात आहे. दररोज राज्यातील मोठे नेते विविध संशय या विमान अपघाताबद्दल व्यक्त करत आहेत.

आता अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चाैकशीला वेग आल्याचे बघायला मिळत आहे. 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडले, याचा तपास सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात 4 तास सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. सीआयडीच्या तपास 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडले, या दिशेने आहे. हेच नाही तर 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या दाैऱ्याचे नक्की नियोजन कोणी केले, याबाबतचे काही प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांनी 27 तारखेला त्यांच्या प्रवासाबद्दल कोणाकोणासोबत चर्चा केली, याबाबतही माहिती घेतली जात आहे. हेच नाही तर अजित पवार यांच्या प्रवासासंदर्भात काही बदल झाले का? याचीही सखोल चाैकशी केली जात आहे. हेच नाही तर 28 जानेवारीचा दाैरा कोणाच्या सांगण्यावरून ठरवण्यात आला, याबाबत तपास केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles