कोविड काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मृत्यू सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 50 लाखांची कुटुंबियांना मदत
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी कै.दादासाहेब झुंबर श्रीराम यांनी कोविड काळात आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमावले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ त्याच्या कुटुंबाला मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मी स्वतः विशेष लक्ष घालून हे प्रकरण जिल्हा परिषदेमार्फत मार्गी लावले.
आज त्यांच्या पत्नी श्रीमती नंदाताई श्रीराम व पुत्र कु.सौरभ श्रीराम यांच्याकडे शासन निर्णयानुसार ५० लाख रुपयांचा विमा अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा क्षण केवळ आर्थिक मदतीचा नव्हे, तर शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे याचे उदाहरण आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर: माजी जि.प. सदस्य श्री. शांतीलाल कोपणर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री. शिवाजी कारंडे, श्री. जयसिंग देवकाते, जि.प. कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब ननवरे, गटविकास अधिकारी श्री. रुपचंद जगताप, ग्रामविकास अधिकारी श्री. अविनाश मेहेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शाम भोसले आदींची उपस्थिती लाभली.


