Saturday, February 21, 2026

नगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत निर्णायक घडामोड; ठाकरे – गवई गट एकत्र…

प्रतिनिधी : अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे. या माध्यमातून आपण मनपा निवडणूक शतप्रतिशत जिंकू, असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. आंबेडकरी समाज, भीमसैनिक हा शिवसेने सोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते. हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे रिपाई (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटले आहे.

शिवसैनिक, भीमसैनिकांनी कंबर कसून कामाला लागा. शिव – शाहू – फुले आंबेडकरांचा विचार आणि आपले शहर विकासाचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक भाग पिंजून काढा. घराघरात जा, असे आवाहन यावेळी काळे यांनी केले. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात आधी शिवशक्ती, भीमशक्तीचा प्रयोग केला होता. आता तो नगर शहरात पण झाला आहे. आगामी काळात आम्ही ग्रामीण जिल्ह्यात देखील हा प्रयोग यशस्वीरित्या करणार आहोत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, अनिस चुडीवाला, उपशहर प्रमुख सुनील भोसले, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, उषा भगत, शैला लांडे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, रिपाई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुलामअली शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रूकडीकर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष निजाम शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, शहर सचिव आफताब बागवान, युवक शहर उपाध्यक्ष योहान चाबुकस्वार, युवक शहर सचिव हुसेन चौधरी, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, झाहिद अली सय्यद, मुस्तफा शेख, हुसेन चौधरी, राजेश बनसोडे, जय गजरमल, मंगेश तिजोरे, आकाश काळे, अभिजीत पंडित, स्वप्निल साठे, लकी वाघमारे, योहान चाबुकस्वार, सोहेल शेख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही शिवसेनेचे छोटा भाऊ :
सुशांत मस्के म्हणाले, आता रिपाई गवई गटाने ठाकरे शिवसेने बरोबर आघाडी केली आहे. अन्य कुणाशी आघाडी करायची किंवा कसे याचा निर्णय हा सर्वस्वी शिवसेनेने घ्यावा. जो काही निर्णय शिवसेना येईल त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. आम्ही शिवसेनेचा छोटा भाऊ आहोत. आंबेडकरी समाजाला हातात हात घालून मोठा भाऊ या नात्याने शिवसेना पुढे घेऊन जात आहे. आम्ही देखील खांद्याला खांदा लावून निवडणूक ताकतीने लढणार आहोत. आमचे अंतर्गत जागावाटप आम्ही चर्चेतून ठरवू, असे म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर दक्षिणची लवकरच बैठक :
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना ताकतीने लढणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील नगर शहरासह सर्व तालुक्यातील इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles