Friday, February 20, 2026

प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मंगळवारी लोकार्पण सोहळा

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मंगळवारी लोकार्पण सोहळा

आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांनी केली पाहणी

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे, यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, शिवाजी डोके, इंजि. केतन क्षीरसागर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर आदित्य बल्लाळ, अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर आदी उपस्थित होते
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असल्यामुळे बऱ्याच वर्षाचे नगरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, स्वर्गीय माजी नगरसेवक कैलास गिरवले यांनी 2007 साली महापालिकेत पुतळा उभारण्यासाठीचा ठराव केला होता, मात्र पुढे काहीच कारवाई झाली नव्हती, आम्ही हा विषय हाती घेऊन पूर्णत्वाकडे नेला आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराला उजाळा आणि प्रेरणा देणारा हा पूर्णाकृती पुतळा ठरेल त्यांनी हिंदू धर्माकरता स्वतःची आहुती दिली, त्यांचे शूरवीर कार्याची आठवण या पुतळ्याच्या माध्यमातून हजारो वर्ष निघत राहील या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर पडेल, असे ते म्हणाले.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असून मंगळवारी सायंकाळी त्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होत आहे, पुतळा उभारण्यासाठीचा चौथारा हा १८ फूट उंच असून त्यावरती पुतळा हा १५ फुटाचा आहे तो ब्रांच धातूचा आहे परदेशी आर्ट यांनी तो पुतळा तयार केला आहे अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles