Thursday, October 30, 2025

नगर शहरातील मिस्कीन मळा समोरील आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटविण्याची नगरसेवक योगीराज गाडे यांची मागणी

मिस्कीन मळा समोरील आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटविण्याची मागणी – महानगरपालिकेकडून कारवाईचे आश्वासन

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सावेडी विभागातील मिस्कीन मळा समोरील आरक्षण क्र. १९३ व १९५ ही जागा महानगरपालिका विकास आराखड्यानुसार शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असून, सार्वजनिक हितासाठी राखीव आहे. तरीदेखील सदर जागेवर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम उभे राहिले असून, याविरोधात आज माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.

गाडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती व सद्यस्थिती उपआयुक्तांना देत, तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर महानगरपालिकेने तत्काळ कारवाई केली नाही, तर नागरिकांसह मनपा कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून बेकायदेशीर बांधकाम पाडेपर्यंत संघर्ष केला जाईल, जसे की २०१६ मध्ये करण्यात आले होते.

यावर उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी आश्वासन दिले की, आंदोलना पर्यंत परिस्थिती जाणार नाही, कारण महानगरपालिका तात्काळ कारवाई करून ही शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा संरक्षित ठेवेल आणि बेकायदेशीर बांधकाम हटवेल.

सन २०१६ मध्ये महानगरपालिकेने याच जागेवरील बेकायदेशीर बांधकाम हटविले होते, तरीही पुन्हा अवैध रचना उभी राहणे ही गंभीर बाब असल्याचे गाडे यांनी निवेदनात नमूद केले. सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली जागा मोकळी ठेवणे हा नागरिकांचा हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, जेम्स अल्हाट, गौरव धोणे, आनंद राठोड, प्रथमेश महिंदरकर, संदीप थोंबरे, प्रशांत डेरेकर, मुन्ना भिंगर्डीवे यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles