Saturday, February 21, 2026

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधीमंडळातील काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एखाद प्रकरण झाले, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात. आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे, त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे, प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही असे बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत, त्यांच्या सह्या आहेत. मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटील वर का दाखल झाला?पुणे जमीन घोटाळाप्रकरणी आता सांगण्यात येत आहे की, दिग्विजय पाटील याला व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते,पण व्यवहार करायला पैसे आले कुठून? व्यवहार कुणामुळे झाला? कुणामुळे स्टॅम्प ड्युटी माफ झाली? पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे.या प्रकरणाशी सबंधित महसूल विभागाचे अधिकारी,उद्योग संचानालय, शीतल तेजवानी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, तीन महिन्यापूर्वी कानावर आले, चुकीच्या गोष्टी मला चालणार नाही अस सांगितले होते. मग तेव्हाच पार्थ पवार यांना अजित पवार यांनी का थांबवले नाही? घरात हा व्यवहार होतो हे माहीत होते तेव्हाच थांबवले असते तर हा घोटाळा घडला नसता अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles