Thursday, February 19, 2026

शरद पवारांचं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंची पुढची भूमिका काय असेल? हे लवकरच…

: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर केलेल्या आरोपांबाबतही शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे, भाजपाकडून नाही, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एक मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही जास्त बोलत नाहीत. मात्र, त्यांची पुढची भूमिका काय असेल? हे लवकरच कळेल असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?

महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांत दिल्लीचे दोन दौरे केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा परत येण्याच्या बाबतीत काही संकेत देत आहेत का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना विचारला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “असे कोणते संकेत वैगेरे काही नाही. आम्ही अशा कोणत्या चर्चा केल्या नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा स्वभाव आहे की ते कधीही जास्त बोलत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांचा पुढचा मार्ग कसा असेल? याचा अंदाज लवकरच येईल”, असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे.

“दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी देखील उपस्थित होतो. पहिल्यांदा हे सांगायचं आहे की मी कालपासून पाहत आहे की, दिल्लीत उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले होते? यावरून राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेजेंटेशन केलं, आता प्रेजेंटेशन पाहायचं म्हटलं की आपण पहिल्या रांगेत कधी बसत नाही. जसं आपण एखादा चित्रपट पाहायला गेलं तर पहिल्या रांगेत बसत नाहीत, आपण पाठिमागे बसतो. त्याच पद्धतीने मी स्वत: देखील शेवटी बसलो होतो. सांगण्याचं तापत्पर्य एवढंच आहे की स्क्रिनच्या जवळ आपण बसत नाहीत, अंतर सोडून बसतो. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले? याचं दुर्देवाने राजकारण करण्यात येत आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles