मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकलं आणि मुंबईची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून गेली.. एवढंच नाही तर जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाने सरकारची कोंडी झालीय.. तर मुंबईकरांचेही हाल होत आहेत.. त्यावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच घेरलंय…एवढंच नाही तर एकनाथ शिंदेच आंदोलकांना रसद पुरवत असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय..
एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसद पुरवत असल्याची अप्रत्यक्ष टीका विरोधकांकडून होत आहे.. दरम्यान मनोज जरांगेंनी फडणवीसच शिंदेंना काम करु देत नव्हते याचा पुनरुच्चार केलाय…
खरंतर एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती.. त्यानंतर वाशीत मनोज जरांगेंच्या हाती सगे सोयरे अधिसूचना देत गुलाल उधळला होता.. आता तेच आश्वासन पूर्ण न झाल्यानं आरक्षणाचा तिढा वाढलाय… मात्र विरोधकांच्या आरोपानुसार मनोज जरांगेंच्या मागे एकनाथ शिंदे असतील तर त्यांचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित होतोय…


