रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी प्रतिक्रिया;म्हणाल्या…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दोन दिवस टिकेची झोड उठल्यानंतर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शुक्रवारी (दि. २० मार्च) सायंकाळी चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून आपला राजीनामा सुपूर्द केला. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.
दरम्यान हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी भोंदू बाबा खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही.”
https://x.com/SunetraA_Pawar/status/2035231771936399595?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2035231771936399595%7Ctwgr%5E789dab333d91bd86e70942d694162180e5e5bfc4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fdcm-sunetra-pawar-first-reaction-after-rupali-chakankar-resignation-on-baba-ashok-kharat-case-kvg-85-5785876%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles