Friday, February 20, 2026

पाथर्डीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना ; संशयितास तीन तासांत अटक

पाथर्डी शहरातील कसबापेठ परिसरात बुधवारी (दि.18) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असतानाच पाथर्डी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेत कारवाईची चपळता दाखवली.

याबाबत श्रीहरी भास्कर बोरुडे (वय 35, रा. कसबापेठ, पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की, रात्रीच्या सुमारास कुटुंबासह घरी असताना दगड फेकल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता विनोद श्रीधर कोकाटे (रा. कोकाटे वस्ती, खेर्डा रोड, पाथर्डी) हा नशेत घराशेजारील पुतळ्यावर सिमेंट ब्लॉक फेकताना दिसला. आव ाज दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी पाहणी केली असता पुतळ्याला आघात झाल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीचा माग काढला. आरोपी कोकाटे हा त्याच्या घराजवळील उसाच्या शेतात लपून बसल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्रीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. संबंधित आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे पुतळ्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत असून इतर धार्मिक स्थळांबाबतही त्याने असे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles