Friday, March 20, 2026

…तर मी मुलीचा पहिला सबस्क्रायबर असेन ; लेकीच्या करिअरबाबत देवेंद्र फडणवीसांची खास प्रतिक्रिया!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ: पिक्सल्स एंड प्ले’ आणि ‘ग्लोबल ईस्पोर्टस गेम्स फायनल्स’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कॉन्टेट क्रिएटर्स आणि इन्फ्युअन्सर्सशी गप्पा मारल्या. या क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच, काही कंटेंट क्रिएटर्सनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विद्यार्थ्यांना गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरची स्पष्ट दिशा मिळावी यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात आली आहे. हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील ७०% गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले असून, पुढील २ ते ३ वर्षांत प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होईल, ज्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जस्ट निल थिंग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या नील साळेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की तुमच्या मुलीने ठरवलं आणि तुम्हाला सांगितलं की तिला गेमिंगमध्ये करिअर करायचं आहे तर तुमची परवानगी असेल का?

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शंभर टक्के परवानगी असेल. ती जे काही करेल यासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. जर तिने काही कंटेट क्रिएट केला तर तिचा पहिला सबस्क्रायबर मी असेन. मी निश्चिंतपणे तिला सांगेन की कोणतंही करिअर केलं तरी त्यात मेहनत महत्त्वाची असते.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles