धाराशिवमध्ये कलाकेंद्रातील नर्तकीच्या नादी लागून 25 वर्षीय अश्रुबा कांबळे या तरुणाची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर अश्रुबा कांबळेची आत्महत्या नाही, तर हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. कला केंद्रातील नर्तकीच्या नादाला लागून उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादाला लागून 25 वर्ष तरुणांना आत्महत्या केली. अश्रुबा कांबळे असे तरुणाचं नाव आहे. धाराशिव येथील साई कला केंद्रातील नर्तकीने सततचा तगादा लावला. नर्तकीसोबतच्या प्रेम संबंधामुळे अश्रुबा कांबळेची पत्नी त्याला सोडून गेली. घरातील सोनं पैसे दिले. पोस्टातील आरडीमोडून अश्रुबा कांबळेने प्रेयसीला पैसे दिले. त्यानंतरही वारंवार पैशाची मागणी होत होती असा आरोप कुटुंबीयकडून केला जात आहे. शिवा अश्रूवाची आत्महत्या नसून हत्या आहे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी कुटुंबाने केली.
अश्रुबा अंकुश कांबळे वय वर्ष 25 या तरुणाचे धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाले होते. यानंतर अश्रुबा कांबळेने गळफास घेऊन जीवन संपवले होते. अश्रुबा कांबळे रुई ढोकी या गावचा रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षापासून अश्रुबा कांबळे आणि धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
अश्रूबा आणि कलाकेंद्रात काम करणार नर्तकी शिंगणापूरहून परतत होते. याच वेळी अश्रूबा कांबळे या तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला. त्यानंतर नर्तकी आणि अश्रूबा यांच्यात वाद झाला. हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आता नर्तकी पूजा उर्फ आरती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


