डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावणाचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, आता परत एकदा अमेरिकेकडून धमकी दिली असून काही गंभीर आरोपही लावली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच कारणीभूत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच हे युद्ध जास्त काळ सुरू आहे.हेच नाही तर भारताला टॅरिफवर कोणत्याही प्रकारची सुट देण्यात येणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी प्रेसमध्ये म्हटले की, शांतीचा रस्ता हा भारताहून जातो. मी भारतावर खूप प्रेम करतो. नक्कीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत. मात्र, भारताला हे समजले पाहिजे की, त्यांच्यामुळे काय होतंय. मुळात म्हणजे असे आहे की, हे युद्ध थांबवले पाहिजे तर त्याला प्रोत्साहन दिल्यासारखे होतंय. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि रिफाइन करतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जातो.
रशियाला ते मोठ्या प्रमाणात या बदल्यात पैसा देतात आणि रशियाकडून याच पैशातून हत्यार युद्धासाठी खरेदी केली जातात. याच्या माध्यमातून युक्रेनच्या नागरिकांचा जीव घेतला जातो. मात्र, नवारो यांचे बोलणे अमेरिकी मीडियाला देखील पटले नाही. त्यांनी लगेचच चीनसोबतच्या तेल खरेदीवर प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे. काहीही झाले तरीही अमेरिकेला भारतालाच दोषी ठरवायचे असल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाब टाकला जात आहे.
सातत्याने अमेरिकेकडून भारतावर टॅरिफच्या मुद्द्यावरून आरोप केली जात आहेत. त्यामध्येच आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला त्यांनी भारताला कारणीभूत ठरवले आहे. अमेरिकेला काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत भारताने अजून काही महत्वाचे करार अमेरिकेसोबत केली आहेत.


