साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्सव शनिवार दि. 5 एप्रिल ते सोमवार दि. 7 एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. या उत्सव कालावधीत एकूण रुपये 4 कोटी 26 लाख 07 हजार 182 इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यामध्ये रोख स्वरुपात रुपये 1 कोटी 67 लाख 89 हजार 78 दक्षिणा पेटीत देणगी प्राप्त झाली असून, देणगी काऊंटरवर 79 लाख 38 हजार 830 रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास देणगी 47 लाख 16 हजार 800, ऑनलाईन चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट क्रेडीट कार्ड, युपीआय याद्वारे 1 कोटी 24 लाख 15 हजार 214, सोने 83.300 ग्रॅम रक्कम रुपये 06 लाख 15 हजार 782 व चांदी 2030.400 ग्रॅम रक्कम रुपये 01 लाख, 31 हजार 478 यांचा समावेश आहे. श्रीरामनवमी उत्सव कालावधीत अडीच लाखाहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये साईप्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 61 हजार 529 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत 1 लाख 76 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले.
या कालावधीत 3 लाख 63 हजार 074 लाडूप्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 72 लाख 61 हजार 480 रूपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सांगितले.


