मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांना इंग्लंडच्या आय.सी.पी.एस.ची सदस्यता
१७ वर्षांच्या विनामूल्य सेवेची आंतरराष्ट्रीय दखल
अहिल्यानगर-
निवडणूक व्यवस्थापन,स्वीप मधील नवोपक्रम तसेच लोकशाही प्रशिक्षणे देणाऱ्या आंतरराष्ट्रीय संसदीय अभ्यास केंद्र (international centre for parliamentary studies)या इंग्लंडच्या लंडनस्थित आस्थापनाने येथील जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांच्या सुमारे १७ वर्षांच्या विनामूल्य निवडणूक मतदान सेवेची आंतरराष्ट्रीय दखल घेत नुकतीच सदस्यता प्रदान केली आहे.
गेल्या १७ वर्षांपासून जिल्हा मतदारदूत म्हणून विनामूल्य सेवा देताना २०१४,२०१९ व २०२४ च्या लोकसभा-विधानसभा, मनपा २०१८ व २०२६,जिल्हा परिषद पंचायत समितीतसेच पदवीधर शिक्षक निवडणुकांदरम्यान डॉ.बागुल यांनी जिल्हा स्वीप समितीचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यामध्ये सतत सहभाग घेतला आहे.त्यांच्या विविध संकल्पनांची दखल घेत भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र,राज्य निवडणूक आयोग,यशदा-पुणे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय आदी विविध घटकांनी यातील निवडक संकल्पना देशभरात वेळोवेळी राबवल्या.
जगभरातील लोकशाही पद्धती ,निवडणुका, मतदानाच्या नवनवीन संकल्पना,आंतरराष्ट्रीय परिषदा,लोकशाही पुरस्कार,मतदार जनजागृतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना जगभर व्यासपीठ देणे आदी उपक्रम या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून राबवले जातात.
मतदार जनजागृतीमधील बागुल यांच्या युवारा,हजारो पथनाट्ये,बसस्थानक-रेल्वेस्थानक सजावटीबरोबरच माहिती व तंत्रज्ञानाच्या संकल्पनेतून गुगल असिस्टंट स्पीकर,डीव्हिडि-ओ,आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून व्हिडिओ- ग्राफिक इमेजेस निर्मिती, ए.आर.-व्ही.आर,आग्युमेंटेड रियालिटी व व्हर्चुअल रियालिटी,क्यू आर कोड,वेबपेज, व्हॉट्सअप स्टिकर,स्वीप टीव्ही चॅनेलची निर्मिती,संकल्पपत्र संकल्पना,एक पोस्ट कार्ड लोकशाहीला,T-20 सेल्फी पॉइंट,विधानमंडप,मतदारनगरी,भारतमंडपम् या संकल्पना देशभरात विशेष गाजल्या.या कामी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत.


