Saturday, February 21, 2026

डॉ. ऋषिकेश पंडित यांना IRCADच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत ‘फॅकल्टी’चा बहुमान

डॉ. ऋषिकेश पंडित यांना IRCADच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत ‘फॅकल्टी’चा बहुमान

नगर: स्त्रीरोग चिकित्सेतील दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांच्या (लॅप्रोस्कोपी ॲण्ड हिस्टरोस्कोपी ) प्रशिक्षणासाठी आणि संशोधनासाठी जगभरात नावाजलेली आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून IRCADची (आयआरसीएडी) ओळख आहे. फ्रान्समधून सुरू झालेल्या या संस्थेची अनेक देशांमध्ये केंद्रे आहेत, जिथे दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते.
या प्रतिष्ठित संस्थेने इंदौर (मध्य प्रदेश) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गायनेकोलोजिक लेप्रोस्कोपी व हिस्टरॉस्कोपी ट्रेनिंग कार्यशाळेत अहिल्यानगरचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पंडित यांना ‘फॅकल्टी’ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. हा अहिल्यानगरसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता.

या कार्यशाळेदरम्यान डॉ. पंडित यांनी काही महत्त्वाच्या लेप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. जगभरातून आलेल्या नामांकित स्त्रीरोग तज्ञांनी त्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली आणि त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देशातील 20 हून अधिक गायनेकोलोजिक सर्जन्सना दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात आले. अहिल्यानगरच्या एका डॉक्टरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हा सन्मान मिळणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

डॉ. ऋषिकेश पंडित हे अहिल्यानगरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून, त्यांचे नवे 3डी लेप्रोस्कोपी सेंटर लवकरच शहरात सुरू होत आहे. यामुळे अहिल्यानगर व एकूणच इतर भागातील महिलांना अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांचा लाभ घेता येणार आहे. डॉ. पंडित यांच्या या प्रयत्नांमुळे स्त्रीरोग चिकित्सेच्या क्षेत्रात अहिल्यानगरचे नाव अग्रस्थानी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles