जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही कामातूनच राजकारणाची ओळख निर्माण केली ; माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील
कर्डिले साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसोबत राहू; अक्षय कर्डिले
राजकारणात भाषणे कमी आणि प्रत्यक्ष काम अधिक झाले पाहिजे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड केवळ आश्वासनांतून नव्हे, तर ठोस कामांतूनच झाली पाहिजे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि पुढेही देणार नाही, असे ठाम प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, ALIMCO, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र व ब्राम्हणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधन वाटप व विविध विकास कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्राम्हणी गावचे ज्येष्ठ नेते कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृण बानकर डॉ तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे विक्रमराव तांबे विजयराव बानकर उत्तमराव आढाव उत्तमराव म्हसे शरद पेरणे रविंद्र म्हसे सिताराम ढोकणे अमोल भनगडे आर आर तनपुरे धनंजय आढाव आशिष बिडकर अनिल आढाव भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर सरपंच सुवर्णा बानकर उपसरपंच महेंद्र तांबे मधुकर पवार किशोर वने उत्तम खुळे गिरीराज तारडे भानुदास मोकाटे दिलीप तारडे अनिल ठबे बाळासाहेब जाधव अरुण बानकर अशोक नगरे समीर पठाण नंदु शिदे तसेच भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी, पत्रकार, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, स्वर्गीय कर्डिले साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य, शेतकरी आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठी समर्पित केले. निवडणूक जिंकणे किंवा पद मिळवणे हे कधीच त्यांचे अंतिम ध्येय नव्हते. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच त्यांचे खरे राजकारण होते. त्यांच्या संकल्पनेतूनच या योजनेची सुरुवात ब्राम्हणी गावातून झाली आणि आज ती प्रत्यक्षात उतरलेली पाहणे हे समाधानाचे आहे
ते पुढे म्हणाले मी आज खासदार नसलो तरी माझे काम थांबलेले नाही. अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला असून, या एका महिन्याला दीड लाख टनांहून अधिक उसाचे गाळप केले जात आहे. माजी खासदार असलो तरी शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचे आणि ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य देण्याचे काम मी सातत्याने करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. व राजकारणात कोणताही स्वार्थ न ठेवता काम केल्याचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, ग्रामपंचायत, सरपंच, आमदार, खासदार किंवा मंत्रीसर्व पदे ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात. जनतेने दिलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे. आज मिळालेले साहित्य योग्य वापरात आणावे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम आनंदाचा असला तरी कर्डिले साहेब आपल्या सोबत नसल्याची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत आहे. हा उपक्रम त्यांच्या संकल्पनेतूनच नियोजित झाला होता. जनतेवर, विशेषत ब्राम्हणी गावावर त्यांचे अपार प्रेम होते. ब्राह्मणीतील कोणताही नागरिक कुठल्याही विषयासाठी साहेबांकडे गेला, तरी त्यांनी कधीही नकार दिला नाही. आजपर्यंत साहेबांकडे ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आम्हा सर्वांवर आहे. कर्डिले साहेबांचे आशीर्वाद आणि डॉ. सुजय विखे पाटील तसेच नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन हीच आमची खरी ताकद आहे, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने तालुका व जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत राहू. कर्डिले साहेबांना सर्वाधिक प्रिय असलेली गोष्ट म्हणजे जनतेत राहणे, जनता दरबार घेणे आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे. त्याच विचारांवर चालत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करत राहण्याचा शब्द मी आज देतो


