Friday, October 31, 2025

तारकपूर आगारातील बसमध्येच नगर तालुक्यातील चालकाची आत्महत्या

अहिल्यानगर-कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका एसटी चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना तारकपूर बस स्थानक परिसरात घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय 54 रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तारकपूर आगारातील एका एसटी बसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती तोफखाना पोलिसांना गुरूवारी (2 ऑक्टोबर) सकाळी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आत्महत्येची माहिती कळताच परिसरात एसटी कर्मचार्‍यांनी मोठी गर्दी केली होती. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, बुधवारी (1 ऑक्टोबर) तारकपूर आगाराचे वाहतूक नियंत्रण शिवाजी मारूती खजीनदार (वय 56) यांनी चालक धामोरे यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, चालक धामोरे हे तारकपूर-घोसपुरी बसवर कर्तव्यावर असताना त्यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी मद्य सेवन केल्याचे सिध्द झाले. या प्रकरणी त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईच्या धक्क्याने किंवा बदनामीच्या भीतीने धामोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles