राहाता व कोपरगाव तालुक्यात ४ व ५ ऑक्टोबर या कालावधीत
तात्पुरता लाल झोन/ उड्डाणबंदी क्षेत्र म्हणून घोषित
अहिल्यानगर, –केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये दि. ४ व ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान लोणी ता. राहाता तसेच कोपरगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न् होणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये राहाता व कोपरगाव तालुक्यात दि. ४ व ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये तात्पुरता लाल झोन/ उड्डाणबंदी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.


