Thursday, March 12, 2026

पारनेर तालुक्यात संतापजनक घटना, मोठ्या बहिणीवर दोघांकडून अत्याचार तर छोट्या बहिणीचा ५ जणांकडून विनयभंग

पारनेर (प्रतिनिधी) – ओळखीचा गैरफायदा घेत एकाने १५ वर्षीय मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. हे त्याच्या मित्राला सांगितले. त्यानेही बदनामी करण्याची धमकी देत त्या मुलीवर अत्याचार केला. तर त्याच पिडीत मुलीच्या १३ वर्षीय बहिणीला ५ जणांच्या टोळक्याने गेल्या महिनाभरापासून त्रास देत तिचा वारंवार विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार गावात समोर आली आहे. या प्रकरणी दोघांवर अत्याचार, पोक्सो आणि ५ जणांवर विनयभंग, पोक्सो अंतर्गत २ वेगवेगळे गुन्हे पारनेर पोलिस ठाण्यात १० मार्च रोजी दाखल करण्यात आले आहेत.
पहिली फिर्याद पीडीत मुलींच्या आईने दिली आहे. त्यात नमुद करण्यात आले आहे की, दि.९ मार्च रोजी त्या पारनेर येथून दुपारी चार वाजता कान्हूरपठार येथे घरी आल्या असता दुपारी साडेचार वाजता त्यांच्या दोन्ही मुली घरी आल्या. आईला संशय आल्याने त्यांनी लहान मुलीस विश्वासात घेऊन विचारले असता गावातील विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे, शुभम अल्हाट रोहित संजय चत्तर यांनी मारुती ओम्नी गाडी (क्र. एम एच १२ ए एफ ६६२५) या गाडीतून त्यांना वेसदरे येथे फिरण्यासाठी नेले होते. तुमचे आमच्याकडे फोटो आहेत. तुम्ही आल्या नाहीत तर ते व्हायरल करू अशी धमकी दिल्याचे मुलीने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वेसदरे येथे जाताना दोघी पिडीत मुली तसेच इतर तीन मुली या आरोपींसोबत होत्या. प्रवासादरम्यान आरोपी मुलींशी लगट करून त्यांचा वारंवार विनयभंग करत होते. वेसदरे येथे पोहचल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारत असताना आरोपी पाचही मुलींना दरीमध्ये उडया मरा असे सांगत होते. त्याच वेळी पिडीत मुलीचे काका घटनास्थळी पोहचले असता आरोपी गाडी घेऊन तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमुद आहे.

दोघा पिडीत मुलींकडे अधिक चौकशी केली असता लहान मुलीने सांगितले की, दि.२ मार्च रोजी दुपारी १ वाजता शुभम आल्हाट याने घरासमोर येऊन तिला धमकी दिली. तु मळगंगा मंदिरात ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल या धमकीमुळे मुलगी मंदीरात गेली. तिथे शुभम आल्हाट याने विनयभंग करत तिचे फोटो काढल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

मोठ्या मुलीनेही कथन केली आपबिती

दुसरी फिर्याद पिडीत मुलींच्या वडिलांनी दिली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, त्यांची मोठी मुलगी कान्हूर पठार येथील जनता विद्या मंदिर येथे इयत्ता दहावीची परीक्षा देत असून दुसरी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. इयत्ता सातवीच्या मुलीसोबत करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलीनेही आपल्यावर झालेले अत्याचार कथन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार

दिवाळीनंतर दहावीमध्ये शिकत असलेली मुलगी शाळेत जात येत असताना तिची ओळख कान्हूरपठार येथील प्रसाद संदीप साळवे याच्यासोबत झाली. या ओळखीचा फायदा घेत प्रसाद याने दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास एका मुलीच्या घरी तिला बोलवून घेतले. त्या मुलीच्या घरी कोणीही नसताना प्रसाद याने मुलीस जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मित्रानेही केला अत्याचार

प्रसाद साळवे याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर धमकी देत अत्याचार केल्यानंतर त्याने ही बाब त्याचा मित्र अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे यास सांगितली. दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अनिल उर्फ गुंड्या याने शाळेजवळ येऊन प्रसाद याने तुइ-यावर अत्याचार केल्याची माहीती मला समजली आहे. तु जर मला घरी भेटण्यासाठी आली नाहीस तर ही माहीती मी व्हायरल करेल अशी धमकी त्याने दिली. त्याला समजावण्यासाठी विद्यार्थिनी किन्ही रस्त्यावरील इंदिरा वसाहतीमधील अनिल उर्फ गुंडया याच्या घरी गेली. घरी कोणी नसल्याने अनिल उर्फ गुंड्या याने विद्याथनीवर अत्याचार केला. कोणाला सांगितले तर प्रसाद याने केलेली घटना व्हायरल करेल अशी धमकी दिली. विद्याथनीचे शिक्षण सुरू असल्याने तिने ही घटना घरी सांगितली तर शिक्षण बंद होईल या भितीने पालकांपासून लपवून ठेवले. असे या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles