Tuesday, October 28, 2025

प्रशांत किशोर यांना धक्का, प्रशांत किशोर यांचं नाव दोन मतदारसंघात ? निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, असं असताना जन सुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणात पुढील तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांचं नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीत प्रशांत किशोर यांचं नाव असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र, नियमानुसार, एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांचं नाव बिहारमधील मतदारयाद्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांमध्येदेखील आहे. पश्चिम बंगालमधील मतदार यादीनुसार १२१, कालीघाट रोड हा त्यांचा पत्ता देण्यात आला आहे. हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील परिसर असून भवानीपूरमधील पक्षाचं कार्यालयदेखील याच परिसरात आहे.

२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलं होतं. दुसरीकडे बिहारमध्येदेखील प्रशांत किशोर यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. सासाराम लोकसभा मतदारसंघातील कारगहर विधानसभा मतदारसंघात किशोर यांचं नाव आहे. मध्य विद्यालय, कोनार या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान होणार आहे. कोरान हे प्रशांत किशोर यांच्या वडिलांचं गाव आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles