Thursday, February 19, 2026

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर, १६ मार्चला मतदान ; पार्थ पवार रिंगणात !

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.

महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य
शरद पवार

रामदास आठवले

फौजिया खान ( श.प गट)

रजनी पाटील ( काँग्रेस)

प्रियांका चतुर्वेदी ( ठाकरे सेना )

धैर्यशील पाटील ( पेण- भाजप )

भागवत कराड ( भाजप )

राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे २८६ इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी ३७आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे १६ आणि उद्धवसेनेचे २० असे तीन पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

मविआ एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, त्या परिस्थितीत ती एक जागा उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावे लागेल. ३७ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ ११ मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे २ तर एमआयएमचे एक आमदार सोबत गेला तर १४ मते अतिरिक्त असतील.

महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles