शिवसेना (शिंदे गट) अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर;
पारनेरच्या शिलेदारांना महत्त्वाच्या पदांवर संधी
पारनेर: जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते व सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीत पदांचे वाटप; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार
पारनेर :- अहिल्यानगर जिल्हा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा नुकतीच करण्यात आली. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्ह्याचे शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीत या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील आक्रमक आणि निष्ठावान नेत्यांना जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहात संधी देऊन तालुक्याचे वर्चस्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पारनेरमधील नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे
या निवडीमध्ये प्रामुख्याने नितीन शेळके यांची युवासेना जिल्हाप्रमुख पदी, बाळासाहेब नाना माळी यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी, स्वप्नील मामा घुले यांची कामगारसेना जिल्हाप्रमुख पदी, संदीप कपाळे यांची जिल्हा संघटक पदी, खंडू भुकन यांची ओबीसी सेल जिल्हाप्रमुख पदी, तर बाळासाहेब ठुबे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियान
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी काळात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व तालुक्यात संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेना पक्षाचे विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणुकीचे रणशिंग: सुजित झावरे पाटलांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्धार
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक गटात आणि गणात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसली असल्याचे यावेळेस स्पष्ट करण्यात आले. तसेच, भविष्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक एकजुटीने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य
केवळ पदे न भूषवता तालुक्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि युवकांचे रोजगार या विषयावर शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करणार
जिल्हा कार्यकारिणीमध्ये पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांना संधी मिळाल्यानंतर आता पारनेर तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वच निष्ठावान कार्यकर्ते व जनसामान्य जनतेच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.


