राज्य सरकारी महावितरण कंपनीने नव्या वीजदरांमध्ये अधिक वीज वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठीच्या दरात घट केली असताना, कमी वीज वापरकर्त्यांच्या दरात मात्र २४ टक्के वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा हे दर घोषित केले.आयोगाने सर्व वीज कंपन्यांच्या प्रस्तावानुसार २०२५-२६ ते २०२९-३०चे पंचवार्षिक दर घोषित केले आहेत. त्यामध्ये १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना २४ टक्के अधिक दराने वीज देयक भरावे लागणार आहे. तर, त्यापुढील वीज वापरासाठीच्या दरात घट झाली आहे.सरीकडे, मुंबईत वीज पुरवणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या दरांमध्ये जवळपास १५ ते २० टक्क्यांची वाढ आहे. अदानी व टाटा कंपनीकडून नाममात्र दरवाढ असल्याचे दिसून येत आहे.
महावितरणने राज्यभरातील २.७५ कोटी ग्राहकांसाठी मूळ प्रस्तावात सरासरी ७ ते ९ टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली होती. यामध्ये १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्याच वीजदरांमध्ये पाच पैसे प्रति युनिटची (०.८५ टक्के) कपात, तर त्यापुढील श्रेणीतील ग्राहकांसाठीच्या वीजदरांमध्ये १०१ ते ३०० युनिटसाठी ९.९५ टक्के, ३०१ ते ५०० युनिटसाठी ७.८२ टक्के व ५०० युनिटपुढील वीज वापरासाठी १.२८ रुपये प्रति युनिट वाढ प्रस्तावित केली होती.
महावितरणचे २०२५-२६चे दर
श्रेणी सध्या नवीन वाढ/घट
०-१०० —५.८८ –७.३२ –२४ टक्के वाढ
१०१-३०० —११.४५ –११.५६ –नाममात्र वाढ
३०१-५०० —१५.७२ –१४.७३ –६ टक्के घट
५०१-१००० —१७.८१ –१५.४१ –१५ टक्के घट


