पाण्यातील सर्वात क्रूर आणि धोकादायक शिकारींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी मगर आणि जंगलातील सर्वात विशाल, ताकदवान प्राणी मानला जाणारा हत्ती या दोघांचा थेट सामना क्वचितच पाहायला मिळतो. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून लाखो लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. अवघ्या काही सेकंदांचा हा थरारक प्रसंग इतका भीषण आहे की तो पाहताना क्षणभर काळजात धडधड वाढते.
या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक प्रचंड हत्ती शांतपणे नदीकाठी उभा आहे. कदाचित तहान भागवण्यासाठी किंवा पाण्यात उतरण्याच्या तयारीत तो असावा. पाणी दिसायला शांत असतं, पण त्याच पाण्याखाली लपलेला धोका कोणालाही दिसत नाही. अचानक नदीतून एक मगर पुढे येते. काही क्षणांतच प्रसंगाला भीषण वळण मिळतं.
https://x.com/rungunyika/status/2004855345458675987?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2004855345458675987%7Ctwgr%5E6448586e7468067b123c08541399c045bf18314c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fshocking-wildlife-moment-caught-on-camera-as-crocodile-attacks-elephants-trunk-near-riverbank-pdb-95-5606573%2F
क्षणाचाही विलंब न करता त्या मगराने हत्तीची सोंड जबड्यात घट्ट पकडली. हा हल्ला इतका अचानक होता की हत्तीही काही क्षण गोंधळून गेला. सोंड ही हत्तीची सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव. तीच पकडली गेल्यावर हत्तीने जोरजोरात सोंड हलवायला सुरुवात केली. कधी वर, कधी बाजूला, तर कधी पूर्ण ताकदीने झटका देत तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता.
पण मगरही काही सहज सोडणारी नव्हती. तिच्या जबड्याची पकड इतकी मजबूत होती की हत्तीच्या हालचालींनाही ती डगमगत नव्हती. काही क्षण असे वाटले की, इतका बलाढ्य प्राणी असूनही हत्ती अडचणीत सापडला आहे. पाण्याच्या काठावर उभा असलेला हत्ती आणि पाण्यातील निर्दयी शिकारी मगर या दोघांमधील संघर्ष पाहून पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला.
हा संघर्ष काही सेकंद चालतो, पण प्रत्येक सेकंद भीती वाढवणारा. अखेर हत्तीने आपल्या अफाट ताकदीचा आणि चतुराईचा वापर करत जोरदार झटका दिला. त्या एका झटक्याने मगरीचा तोल गेला आणि क्षणभरासाठी तिची पकड सैल झाली. हीच संधी साधत हत्तीने सोंड मागे ओढली आणि स्वतःला वाचवलं. पुढच्याच क्षणी तो नदीपासून दूर सरकला आणि मगरीनेही पाण्यात माघार घेतली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे .


