आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत मोठे विधान केले आहे. संख्याबळाअभावी ठाकरे पुन्हा सभागृहात पोहोचू शकतील का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
त्यांना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. असं वाटतंय की उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात पोहोचू शकणार नाहीत, असे विधान पंकज भोयर यांनी केले.
द्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भोयर यांनी ठाकरेंच्या अडचणींकडे लक्ष वेधले. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा (साधारण २९-३० मते) गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या जादा मतांची गरज भासणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुनच पंकज भोयर यांनी टीका केली.


