नगर जिल्ह्यात सोलर कंपनीकडून वीस लाखांची खंडणी ; कंपनीकडून पुन्हा 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप

पाथर्डी : दैत्यनांदूर (ता. पाथर्डी) येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्रोजेक्ट कंपनीकडून 20 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अशोक राधाकिसन दहिफळे (रा. दैत्यनांदुर) याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. पाथर्डी न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आली आहेशैलेश रामलोटन सिंह (वय 46) हे जी.एस.ई. रिन्युएबल इंडिया प्रा. लि., मुंबई या सोलर प्रकल्प कंपनीत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. कंपनीकडून दैत्यनांदूर येथे सोलर प्रकल्प उभारण्यासाठी शेतजमीन खरेदी करताना स्थानिक दोघांनी संगनमत करून कंपनीकडून खंडणी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ओम साई डेव्हलपर्सचे संभाजी शिरसाठ यांच्या शिफारशीवरून शैलेश सिंह यांची अशोक दहिफळे आणि प्रसाद दहिफळे (दोघेही रा. दैत्यनांदूर) यांच्याशी ओळख झाली. सोलर प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना आमच्या माध्यमातूनच व्यवहार व्हायला हवेत; अन्यथा प्रकल्पास विरोध करू, अशी धमकी या दोघांनी दिली. यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ही बाब कळवून त्यांच्या सूचनेनुसार विविध तारखांना आरटीजीएस व चेकद्वारे अशोक व प्रसाद दहिफळे यांना 20 लाख रुपये अदा करण्यात आले.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही वाद न मिटता उलट अशोक व प्रसाद दहिफळे यांनी पुन्हा विविध शासकीय यंत्रणांमध्ये तक्रारी दाखल करून कंपनीवर दबाव निर्माण केला. या दबावाच्या माध्यमातून त्यांनी कंपनीकडून पुन्हा 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तपास करत असून, अशोक दहिफळेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी प्रसाद दहिफळे याचाही तपास सुरू असून, त्याच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles