मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते; बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल
अहिल्यानगर
सोशल मीडियाचा गैरवापर करून एका अल्पवयीन मुलीच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या एका पीडितेने यासंबंधीची तक्रार दिली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पीडितेच्या नावाचा वापर करून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या खात्यावरून आरोपीने पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला संदेश (मॅसेज) पाठवले.या कृतीमुळे पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी झाली. पीडितेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी तातडीने माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
नगर शहरात मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते; बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल
- Advertisement -


