Saturday, February 21, 2026

विवाहाचा बनाव उघड झाल्यानंतर सासऱ्याचे अपहरण; दोघांना अटक, वाशिममधून पळालेल्या आरोपींचा अहिल्यानगरमध्ये पाठलाग

रिसोड, जि. वाशिम येथुन जेष्ठ नागरिकाचे अपहरण करुन दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगारांचा थरारक पाठलाग, 02 आरोपी अहिल्यानगर येथे जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, रिसोड पोलीस स्टेशन, जि. वाशिम गु.र.नं. 1) 980/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 333, 140 (2), 61 (2), 324(4), 351(3), 352, 3(5) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल असुन आरोपींनी लग्नाचा खोटा बनाव करुन सदरचा बनाव उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचे वडिल सिताराम नारायण खानजोडे वय 60 वर्षे, रा. आसेगांव, ता. पेन, जि. वाशिम यांचे अपहरण करुन घेवुन गेले होते. त्यानंतर आरोपी हे अपहरित इसमास घेवुन जात असतांना त्यांनी पुन्हा मापे गावाचे शिवार, ता. रिसोड, जि. वाशिम या ठिकाणी फिर्यादी श्री अंकुश मोहन राठोड रा. बोरगडी, तांडा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड हे त्यांचे मित्रासह दवाखान्यामध्ये जात असतांना त्यांची गाडी क्रमांक 14 एफ. जी. 9849 ही आडवुन व गाडीची काच फोडुन फिर्यादी यांना मारहान करुन 22,000/- रुपये रोख रक्कम जिवे मारण्याची धमकी देवुन दरोडा टाकुन घेवुन गेलेले आहेत. सदर घटनेबाबत रिसोड पोलीस स्टेशन, जि. वाशिम 2) गु.र.नं. 981/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2), 311, 324(3), 126(2) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
वरील गुन्हे दाखल वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना गुन्ह्याची माहिती देवुन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेणेबाबत कळविले. मा. पोलीस अधीक्षक सो, यांनी प्राप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस देवुन कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी, सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, गणेश धोत्रे, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सतिष भवर, योगेश कर्डीले, बाळासाहेब खेडकर, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन शेंडी बायपास, एम.आय.डी.सी. अहिल्यानगर या ठिकाणी नाकाबंदी करीता रवाना झाले.
वरील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शेंडी बायपास परिसरामध्ये नाकाबंदी करत असतांना छ. संभाजीनगर कडुन अहिल्यानगर चे दिशेने एक कार भरधाव वेगात येतांना दिसली. पथकाने पोलीस वाहने रोडला आडवी लावुन संशयीत कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयीत कार चालकाने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगामध्ये एम.आय.डी.सी. कडे निघुन गेला. त्यावेळी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे सपोनि/माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सतिष खामकर, सुरेश देशमुख, अक्षय रोहोकले यांना माहिती कळवुन संशयीत कार थांबविणेबाबत सुचना दिल्या. पथक सदर कारचा पाठलाग करत असतांना संशयीत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे ताब्यातील कार कॉटेज कॉर्नर या ठिकाणी डिव्हायडर वर गेल्याने कार बंद पडली. त्यावेळी कारमधील इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) राहुल दिलीप म्हस्के वय 32 वर्षे, रा. जालना, 2) सतिष उर्फ बालु विनायक जाधव वय 29
वर्षे, रा. जालना, 3) सिताराम नारायण खानजोडे वय 60 वर्षे, रा. आसेगांव, पेन, जि. वाशिम (अपहरित इसम) असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसम नामे 1) राहुल दिलीप म्हस्के वय 32 वर्षे, रा. जालना, 2) सतिष उर्फ बालु विनायक जाधव वय 29 वर्षे, रा. जालना यांचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. अपहरित इसमाची सुटका केल्यानंतर त्यास तसेच आरोपींना रिसोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा. श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles