जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग क्र. १ ते ७५ व निर्वाचक गण क्रमांक १ ते १५० च्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
अहिल्यानगर, दि. ३० – जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग क्र. १ ते ७५ तसेच पंचायत समिती क्षेत्रातील निर्वाचक गण क्रमांक १ ते १५० यांच्या प्रारूप मतदार याद्यांबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करून, अधिप्रमाणित अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
या अंतिम मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये पाहणी व निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल), अहिल्यानगर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदचे ७५ गट आणि तालुका पंचायत समित्यांचे १५० गण यांच्या निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार याद्यांबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून, अधिप्रमाणित अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या अंतिम मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये पाहणी व निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आणि अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवड़णुकीची सर्व पूर्व तयारी पूर्ण झाली आहे.


