अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री निवडणूक वादातून गोळीबार ; युवक गंभीर जखमी

अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कोठला चौक परिसरात काल मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. मुकुंदनगर येथील निवडणुकीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाला असून, यात अब्रार मुख्तार शेख हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी अब्रार शेख हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून जुन्या बस स्थानक परिसरात गेला होता. यावेळी आरोपी जैद सय्यद उर्फ टायप्या, जाकीर सादिक सय्यद उर्फ जाबू आणि एका अनोळखी इसमाने रिक्षामधून त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींच्या हातात बंदूक पाहून फिर्यादीने राज चेंबरच्या दिशेने पळ काढला, मात्र आरोपींनी पाठलाग सोडला नाही. राज चेंबर जवळ आरोपी जैद सय्यद याने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी अब्रारच्या कमरेला लागली आणि तो जागीच कोसळला.

​घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून जाकीर सादिक सय्यद याला रिक्षासह (क्रमांक एम.एच. १६ सी.ई. ००२५) ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी जैद सय्यद अद्याप फरार असून पोलीस सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्याचा शोध घेत आहेत. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तोफखाना पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles