अहिल्यानगर मनपा हद्द पीठ गिरणी संघटनेच्या वतीने दि १ जून२०२५ पासून दळणाच्या भावात वाढ*
अहिल्यानगर – अहिल्यानगर मनपा हद्द पीठ गिरणी संघटनेने आधीच जाहिर केल्या प्रमाणे म्हणजे दि. १ जून २०२५ पासुन दळणाच्या भावात वाढ़ होत आहे या पुढे गहु , ज्वारी , बाजरी ७ रुपये किलो तर दाळी , रवा , तांदुळ १२रुपये किलो व मका नाचनी भरड़ा एस्सर इतर १५रुपये किलो प्रमाणे असणार आहे . भाव वाढीचे भाव फलक संघटनेचे पदाधिकारी व प्रत्येक प्रभागातील समिति सदस्य यांच्या मार्फत गिरणी मालक व चालक यांच्या कड़े पोहोच करण्यात आलेले आहे अशी माहिती संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुड़े यानी दिली .
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यानी सांगितले की प्रत्येक गिरणी चालक किंवा मालक यांच्या कङून संघटनेची सदस्य फी व भाव फलक फी म्हणून ३००रुपये आकारण्यात आलेले आहे . यापैशांचे व्यवस्थित हिशोब ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली .
तसेच प्रत्येक पीठ गिरणी चालक मालक या सर्वांनी संघटनेने ठरवून दिलेल्या दरा प्रमाणेच भाव घ्यावा व कुठल्याही अपप्रचाराला बळी पडु नये जर कोणाला काही तक्रार असेल तर त्यांनी आपली तक्रार लेखी स्वरुपात संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यांच्या कड़े दयावी असे अवाहन कार्याध्यक्ष अकबर पठाण यांनी केले आहे .
जर पीठ गिरणी चालक किंवा मालक यांना भाव फलक भेटले नसतील तर त्यांनी संघटनेचे सल्लागार हाजी ज़मीर शेख ९२२६४३२८६३ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संघटने तर्फे करण्यात आलेले आहे .
अपला
रामकिसन सुपेकर
अध्यक्ष : अहिल्यानगर पीठ गिरणी संघटना


