नागरिकांनी नगरहून पुण्यात जाऊ नये
माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती स्थिर; पुण्यात अतिदक्षता विभागात उपचार चालू
पुणे – अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आता अरुणकाकांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली आहे.
अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच काकांवर प्रेम करणारे व हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन संपत बारस्माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती स्थिर; पुण्यात अतिदक्षता विभागात उपचार चालू
पुणे – अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आता अरुणकाकांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली आहे.
अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच काकांवर प्रेम करणारे व हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन संपत बारस्कर यांनी केले आहे.
अरुणकाका जगताप यांची प्रकृती खालावल्याचे समजताच अनेक मंत्री, खासदार, आमदार व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन काकांच्या तब्येतीची चौकशी करत आ.संग्राम जगताप व माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन जगताप यांची भेट घेतली. सोमवारी सकाळी राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे व मंत्री अदिती तटकरे, खासदार संजय पाटील, आ.बापूसाहेब पटारे आदींनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली आहे.


