Saturday, February 21, 2026

माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून प्रज्वल गीते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत

माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून प्रज्वल गीते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत

संकट काळामध्ये मदतीला धावून जाणारे नगरसेवक म्हणून निखिल वारे यांची ओळख – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर : आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून प्रत्येकाने आपले कर्तव्य बजवावे, प्रज्वल गीते या युवकाला वीज वाहक तारेतून शॉक लागल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती माजी नगरसेवक निखिल वारे यांनी यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तीन महिन्यापूर्वी ऍडमिट केले होते, सर्वांच्या सहकार्यातून त्याचा जीव वाचला आहे, डॉक्टरांनी देखील मदत केली आहे आजारपणातून तो आता बरा झाला असून त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करायची आहे, यासाठी एकूण खर्च ३ लाख रुपये असून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत १ लाख रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे, सण, उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना आपली संस्कृती, परंपरेचे जतन होईल असे उपक्रम साजरे करावे. निखिल वारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मदतीचा हात समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
माजी नगरसेवक निखिल वारे यांची प्रज्वल गीते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द केला, यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक एडवोकेट धनंजय जाधव, अभिजीत खोसे, अजिंक्य बोरकर, युवराज शिंदे, संजय ढोणे, संजय गाडे, दत्ता पाटील सप्रे, मनेष साठे, सुमित कुलकर्णी, रेश्मा आठरे, आशाताई निंबाळकर, सचिन वारे, अजय हिवाळे, स्वामी म्हस्के, विनीत पोकळे, रोहन फरतारे, श्रीनिवास कासार, सचिन गाडे, सार्थक गाडे, प्रवीण गांगड, नकुल बांबरसे, ऋषिकेश भवर, सचिन साळुंके, सोनू खामकर, अक्षय जवंजळे, तेजस गाडे आदीसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, प्रज्वल गीते यांना जास्त दाबाच्या विजेचा करंट लागला असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती आता त्याची तब्येत व्यवस्थित झाली असून त्याच्या हाताची शस्त्रक्रिया कारवाईची असून त्यासाठी ३ लाख रुपये खर्च येत असून मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने १ लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे, त्याला त्याच्या पायावर उभा करायचे असून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे माणुसकीतून समाज एकवटला जात असतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो त्या माध्यमातून चांगले कार्य पार पाडले जाते, प्रज्वल गीते एका मोठ्या संकटातून बाहेर आल्याचा आनंद मला आहे असे ते म्हणाले.
एडवोकेट धनंजय जाधव म्हणाले की, माजी नगरसेवक निखिल वारे हे नेहमीच समाजामधील दीनदुबळ्यांची सेवा करत असतात एखाद्याच्या संकट काळामध्ये त्याला मदतीचा हात देत असतात प्रज्वल गीते यांच्यावर आलेल्या संकटकाळांमध्ये निखिल वारे बरोबर राहिले असल्याचे ते म्हणाले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles