Saturday, February 21, 2026

अजित पवारांना मोठा धक्का, माजी आमदार ‘कमळ’ हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही सांगितली

गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून भाजपमध्ये प्रवेशाचा धडका सुरू झाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार अपूर्व हिरेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अपूर्व हिरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पक्ष प्रवेशाची तारीख देखील सांगितली आहे.

अपूर्व हिरे म्हणाले की, नाशिक शहराच्या विकासासाठी काही मुद्दे आहेत, त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय. नाशिकला कुंभमेळा आहे. येथे आयटी पार्क व्हावा, ही आमची भावना आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबत चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली म्हणून भाजपमध्ये जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा देत आहे. अनेक विकासकामे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्यामुळे आम्ही भाजप जात आहोत. तरुणांचा ओढा भाजपकडे आहे. 2 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. अपूर्व हिरे पुढे म्हणाले की, मी सीमा हिरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण, आमच्यात दुरावा नव्हता. बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यात आधी काय झाले हे माहिती नाही. पण, आता आम्ही सोबत काम करू. माझा भाऊ ठाकरे गटाचे काम करतो. पण तो मालेगावला काम करतो. मी नाशिकला 100 किलोमीटर अंतरावर आहे. मी पदाचे नाही तर शहराच्या विकासाचे प्रश्न घेऊन राजकारण करतोय, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीमा हिरेंकडून अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशाचे स्वागत
दरम्यान, अपूर्व हिरे हे शिक्षक मतदार संघाचे राहिलेले आहेत. 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेल्या सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले आहे. सुधाकर बडगुजर यांना शह देण्यासाठी अपूर्व हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles