बीडच्या गेवराई तालुक्यात नर्तिकीच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःला आत्महत्या केल्याचे संशय मयताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत केला आहे. माजी उपसरपंचाने स्वतःच्या पिस्टलने कानाजवळ गोळी झाडल्याच्या प्रकरणात नवा ट्वीटस्ट आला आहे. आधीच लाखो रूपयांची संपत्ती निर्तिकीच्या नावावर केली होती. पण तरीही तिच्याकडून ब्लॅकमेल केले जात होते. त्या त्रासातून गोविंद यांनी स्वत:वर गोळी झाडली, असे समजतेय.यासंदर्भात 21 वर्षीय पूजा हिने फिर्यादीचे भावजी गोविंद यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवले. वेळोवेळी पैसे, सोनेनाणे हे मावशी आणि इतर नातेवाइकांच्या नावावर प्लॉट जमीन यापूर्वी घेऊन दिलेली आहे. आणखीन भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुला बोलणार नाही. तुझ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पैसे देण्याकरिता वारंवार तगादा लावल्याने फिर्यादीचे भावजी गोविंद यास स्वतःच्या पिस्टलने डोक्यात कानाजवळ गोळी घालून आत्महत्या करण्यास परावृत्त केले म्हणून पूजा देविदास गायकवाड हिच्याविरुद्ध मयताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने फिर्याद दिली आहे.
38 वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे असे मरण पावलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात लुखामसला येथील गोविंद बर्गे हा प्लॉटिंगचा व्यवसाय करत असतानाच त्याचा संपर्क पारगाव थिएटरमधील नर्तिका पूजा हिच्याशी आला. दोघांची जवळीक वाढली. दरम्यान, या काळात गोविंद बर्गे याने काही दिवसांपूर्वी सोन्यानाण्यांसह पावणेदोन लाखांचा एक मोबाइलही तिला घेऊन दिला होता,अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान,दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. याचा समेट घडवण्यासाठी सोमवारी मध्यरात्री गोविंद हा सासरे येथे कारमधून मुलीच्या घरी आला.
पोलिसांना कारमध्ये एक पिस्तूलही आढळून आली. या पिस्तुलीनेच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनास्थळी पोलिसांना संशयास्पद काही गोष्टी आढळल्या असून, हा खून आहे की आत्महत्या? याचीदेखील पडताळणी ते करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा असा परिवार आहे.