Sunday, November 2, 2025

Ahilyanagar news :खरेदी केलेल्या सायोबीनचे पैसे न देवून सव्वाचार लाखाची फसवणूक

Four and a half lakhs of rupees were cheated by not paying for the soybeans purchased in Ahilyanagar district.विक्री केलेल्या सोयाबीनची सव्वाचार लाखाहून अधिक रक्कम न देवून फसवणूक केल्याची फिर्याद नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील शेतकर्‍याने दिली आहे. त्यावरुन शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात राहुरी तालुक्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील शेतकरी गोरक्षनाथ त्रिंबक साळके (वय 53) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कांगोणी शिवारात सन 2023-24 मध्ये सोयाबीनचे पिक घेतलेले होते. एकूण 87 क्विंटल 40 किलो सोयाबीनचे पिक झालेले होते.

सदर सोयाबीन विकण्यासाठी ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी ब्राम्हणी (ता. राहुरी) या कंपनीचे व्यवस्थापक कविता हापसे यांचेशी दि. 16 एप्रिल 2025 रोजी फोनवर बोलणे केले होते. त्यांनी 5000 रुपये क्विंटल प्रमाणे सोयाबीन घेवू असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांना सोयाबीन दिली. दि. 16 एप्रिल 2025 रोजी ते आजपावेतो वेळोवेळी ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक अर्जुन मच्छिंद्र ठुबे, अनिल रखमाजी हापसे, किरण चांगदेव कदम, छाया दत्तात्रय कातोरे, व्यवस्थापक कविता रमेश हापसे, कर्मचारी विठ्ठल छगन ठुबे (सर्व रा. ब्राह्मणी ता.राहुरी) यांनी संगनमत करुन 4 लाख 32 हजार 650 रुपये रक्कम देतो असे म्हणून रक्कम दिली नाही व माझी आर्थिक फसवणूक केली.

या फिर्यादीवरुन अर्जुन मच्छिंद्र ठुबे, अनिल रखमाजी हापसे, किरण चांगदेव कदम, छाया दत्तात्रय कातोरे, कविता रमेश हापसे व विठ्ठल छगन ठुबे यांचे विरुद्ध शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दत्तात्रय पवार हे पुढील तपास करित आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles