ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चार अल्पवयीन लैंगिक अत्याचार ग्रस्त मुलींची सुटका
पीडित मुलींचे आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या पर जिल्ह्यातील अल्पवयीन 4 मुलींवर लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी केली मुक्तता
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेने दिली होती माहिती काल दिनांक 17/09 /2025 रोजी रात्री 9.00 चे सुमारास राहुरी पोलीस स्टेशन येथे उडान फाउंडेशन संचलित स्नेहालय संस्था अहिल्यानगर येथील स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी माहिती दिली की राहुरी तालुक्यामध्ये एका ठिकाणी चार अल्पवयीन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य राहत असून सदर मुलींवर मागील तीन ते चार वर्षापासून लैंगिक अत्याचार सुरू आहेत.
पैकी सदर चार बहिणींपैकी एक सज्ञान झाल्याने व तिला याबाबत समज आल्याने तिने सदरची बाब स्नेहालय संस्थेला सांगितल्यानंतर स्नेहालयाचे स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशन येथे धाव घेत उर्वरित 16 वर्ष, 14 वर्ष व 10 वर्ष वयाच्या तिन्ही मुलींची सदर अत्याचारा मधून सुटका करणे बाबत माहिती दिल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार यांचे पथक तयार करून पोलीस पथकासह कार्यकारी दंडाधिकारी श्री सोपान बाचकर व पंचा समक्ष मिळालेल्या माहितीची खात्री करून चारही पीडित मुलींची 12:30 वाजता सुटका करून पीडिताचे समुपदेशन करून त्यांना स्नेहालय संस्थेमध्ये पहाटे 5.00 वाजता दाखल केले. तसेच आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376,376(2)(n)व पोस्को कलम 4,8,12 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी नामे
1) बजरंग कारभारी साळुंखे वय 39 वर्ष
2 ) शितल बजरंग साळुंखे वय 40 वर्ष दोघे राहणार दवणगाव तालुका राहुरी
यांना अटक केले.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव व गणेश लिपने करत आहे.
ऑपरेशन मुस्कान दरम्यान गेल्या वर्षभरात अपहरित तसेच लैंगिक अत्याचारातील एकूण 86 मुलींची सुटका करण्यात आली आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भावर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे यांनी केली.


