फसवणुक प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी, सुपा ता.पारनेर येथुन जेरबंद,
 स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते.
पोनि/श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोसई/ समीर अभंग, सफौ/रमेश गांगर्डे, मपोहेकॉ/भाग्यश्री भिटे, पोना/ भिमराज खर्से अशांचे पथक तयार करुन आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडे तपासावर असलेला गुन्हा, श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 473/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 316(5), 318(2), 318(4), 3(5) सहा एम. पी. आय. डी. कायदा कलम 3 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
दिनांक 16/09/2025 रोजी गुन्हे शाखेचे पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथील वरील गुन्ह्यात पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, वरील गुन्ह्यातील आरोपी नामे विक्रम बबन गाडीलकर रा. वाघुंडे बु ाा ता. पारनेर हा सुपा परिसरात आलेला आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सुपा परिसरात जावुन, व्यावसायिक कौशल्य वापरुन, आरोपीस ताब्यात घेऊन, त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव विक्रम बबन गाडीलकर वय – 42 वर्षे रा. माळवाडी, वाघुंडे बु ाा ता. पारनेर असे असल्याचे सांगीतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं.473/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 316(5), 318(2), 318(4), 3(5) सहा एम. पी. आय. डी. कायदा कलम 3 प्रमाणे दाखल गुन्ह्यांचे तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


